गाडी...!
गाडी...!
1 min
9.6K
रेल्वे प्रवास ...!
गाडी झुकु फुक्कु
झुकु फुक्कु करत
धड धड पुढे पुढे
सर सर सरकत होती
सायंकाळ सारून
दिवेलागणीची वेळ
काट्याच्या टिकटिकीच्या
साक्षीने रात्रीत प्रवेशत होती
फक्कन दिवे पेटले
अंधाराचे मळभ फाटले
आणि हवा चिरत गाडी
ह्या ह्या ह्यां करीत सुसाट सुटली
तशी मला आठवण झाली
त्या सायंकाळच्या साक्षीदाराची
आज तो मला दिसलाच नाही
कारण मला पाहताच आले नाही
मंद कोठून तरी सुवास
वाऱ्यावरून खिडकीत घुसला
बरे वाटले आणि मी हात जोडले
म्हंटले देवा सुखरूप घेऊन चल....!
