एकटं मन
एकटं मन

1 min

174
कधी कधी मनाला पण त्रास होतो माणसाच्या गर्दीचा
माणसाच्या स्वभावाचा त्याच्या सहवासाचा
मनाला पण हवं असत एकटेपणाची शांतता
ना कसल्या आवाजाची ना आधाराची
फसवे चेहरे ही मन ओळखत
म्हूणन तर कधी कधी अबोल राहत
माणसाच्या स्वभावाच्या गर्दीत मन हे
कुठेतरी भरकटत असत
म्हुणन तर शांततेचा श्वास घेण्यासाठी तळमळत
कधी कधी मनाला एकटेपणाची शांतता बळ देत
परत नव्याने माणसाच्या गर्दीत मिसळण्यासाठी तयार करत