Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

MAHENDRA SONEWANE

Others

4  

MAHENDRA SONEWANE

Others

एकटेपणा

एकटेपणा

1 min
23.2K

आवडीची व्यक्ती जेव्हा टोचून बोलू लागते,

तेव्हा गर्दीत देखील एकटेपणा भासू लागते ||

आधार देईना कोणी, एकटा मी धडपडतो, 

घाव झेलले एकट्याने, एकट्यानेच सावरतो ||

आपण एकटेपणाला नेहमी घाबरतो, 

पण त्या एकटेपणात बरच काही शिकतो ||

ध्येय गाठण्यासाठी आपण एकटेच भले, 

समजत नाही अडथळे आले नि गेले ||

कोणाच्या आयुष्यात आपले महत्त्व कमी होते, 

तेव्हा आपल्याला आपोआपच एकटे एकटे होते ||

कधीतरी जेव्हा मन उदास होते, 

तेव्हा एकटेपणाची जाणिव आपल्यालाच होते ||

एकटे असलं तर ते रागवायला येतात, 

समूहात कौतुक करायला शब्द अपुरे पडतात ||

एकांतात असल्यावर शब्दांशी मैत्री करतो मी,

भूतकाळ आठवून आजही कोरी पानं भरतो मी ||

आयुष्यात आपण जेव्हा एकटे पडतो, 

तेव्हा आपण व फक्त आपणच घडतो ||

Rate this content
Log in