एकटेपण..!
एकटेपण..!
1 min
271
का छळतय मला हे एकटेपण
परिघांच सीमेतील लाछंणपन
सुने सुने वाटतय हे जीणं
सतत तुज आठवणीत जळण...!!
कलंकित माथी माझ तुला देण
मान्य आहे तु मला तुच्छ लेखणं
जखडलय माझ पापी मीपणं
दुःखाच्या पापरेषात आपलेपणं..!!
तुझ्या नात्यांना तु अगत्याने जपणं
स्वैराचाराचे घोडे उधळणं
पापाचे भागीदार होऊन पुण्यवंत राहणं
स्वछंदी बनून बाईपण जपणं..!!!!
