एकांत
एकांत

1 min

11.8K
एकांत ह्या क्षणीचा
साहून आज झाला
उरलेच ना कुणीही
पाहून त्रास झाला!!
मी राबलो असा की
ज्याचा हिशोब नाही
उध्वस्त जीर्ण सारे ,
नाहीच मोल ज्याला!!
माझे मला जगावे,
कळलेच ना स्वतःला
ओघात हाय सारा
वाहून काळ गेला!!
वारा हळूच ऐसा
स्पर्शून जात होता
अश्रूच ओघळावा
वाटे क्षणाक्षणाला