एक संध्याकाळ
एक संध्याकाळ


कोणी एक संध्याकाळ तुझी माझ्यासह जाऊ दे
एक शांत सूर्यास्त अन चहाचा एकच प्याला
क्षितिजाला कवटाळणारा धुंद तो किनारा
अन कधी तनूस झोंबणारा मंद मंद वारा
निसर्गाच्या स्वप्नातून ही रात्र जाऊ दे
कोणी एक संध्याकाळ तुझी माझ्यासह जाऊ दे
वाळूशी खेळणाऱ्या त्या सागराच्या चंचल लाटा
अन घाटात वळण घेणार्या स्वच्छंद वाटा
वेड लागेल माझ्या प्रेमाचे तुला इथून जाता जाता
गीत तुझ्या श्वासातले मला गाऊ दे
कोणी एक संध्याकाळ तुझी माझ्यासह जाऊ दे
नाही जुळले विचार तरी जुळेल आपले मन
एकमेकांत गुंतून जाता स्वर्गीय होतील क्षण
सांग माझ्या आयुष्यी येशील का परतून
पुन्हा आपल्या भविष्यात मला हरवून जाऊ दे
कोणी एक संध्याकाळ तुझी माझ्यासह जाऊ दे