एक कप चहा
एक कप चहा
1 min
17.4K
एक कप चहा
असतो खूप स्पेशल,
प्रत्येक घोट घेत घेत
होतो आपण सोशल...
एक कप संपेपर्यंत
रंगतात खूप सार्या गप्पा,
मोजक्या कामाच्या अाणि
बाकी बिनकामाच्या थापा...
येणा जाणार्या लोकांवर
फिरत असते नजर,
तेवढाच वेळ का होईना
टेन्शन चा पडतो विसर..
एक कप चहा
उन, पाऊस आणि थंडीत
वेगळीच गोडी घेऊन
आणखी होतो स्पेशल...
