STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

एक दिवस..!

एक दिवस..!

1 min
724


एक दिवस माझा

माझ्या साठी काढलेला

आज मला जगायचा आहे....


धागे दोरे सारे

जरा दूर सारून

घालवायचा आहे....


तरी नाळ मागे आतवर

कोठे तरीओढणी लावून

अजूनही मागे खेचती आहे...


सामान्य जीव मी

जरी दूर आलो तरी

मागेच रेंगाळतो आहे...


बंध धाग्याच्या

ओढणीने अजूनही

मागे खेचला जात आहे...


विचारांचा कोंडमारा

धुमसत असताना

धूळ पूरती झाडत आहे...


शांत शांत स्वतःस राखून

शांततेची अनुभूती

इथे आता अनुभवतो आहे....


खळखळत्या अविचारांना

लगाम ध्यानाने घालून

निरव शांततेत मग्न आहे...


या निरव शांततेत

परमेश्वरा तुला

मी याक्षणी जाणतो आहे...


तुझ्या कृपेनेच देवा

या निर्मळतेत तुला

मी डोळे मिटून पाहतो आहे...


रूप तुझे निर्मळ

देवाअंतरी आतवर

श्रद्धेने मी साठवतो आहे...


तुझ्या कुपेचा प्रसाद हा

आज मला सहजी लाभला

खरेच देवा जन्म सार्थकी लागला....!


Rate this content
Log in