STORYMIRROR

Shila Ambhure

Others

4  

Shila Ambhure

Others

दवबिंदू

दवबिंदू

1 min
1.1K



(हायकू)


दव सांडले

घाटात ,रानीवनी

हिरव्या पानी.


दव रुपेरी

चमचम साजिरे

दिसे गोजिरे.


दव नाजुक

राजस सुकुमार

मोहक फार.


पहाटवेळी

दवाचा ल्याला साज

निसर्ग आज.


टाकीते कोण?

दवबिंदुचे सडे

मजला कोडे.


हात लाविता

हळू ते ओघळती

कोमल किती!



साहित्याला गुण द्या
लॉग इन