STORYMIRROR

Prashant Shinde

Others

4  

Prashant Shinde

Others

दूध गंगा अवतरली..!

दूध गंगा अवतरली..!

1 min
15.9K


दूध गंगा अवतरली....!

सकाळी सकाळी

भलतीच पंचाईत झाली

दुधवाल्याची आज

चुकामुक झाली


दुकानातून पिशव्या आल्या

त्या तडक भांड्यात रित्या झाल्या

आणि शिस्ती साठी गपगुमान

कचरा पेटीत जाऊन पडल्या


भांड चढवल गॅसवर

मंद आचेच्या भरोस्यावर

म्हंटल खाली उतरवू

थोडं काम झाल्यावर

झाडू मारला आणि तिचा फोन आला


इथेच खरा घोटाळा झाला

फोनच्या नादात पार बोज्या उडाला

बासुंदीच्या वासाने हॉल भरला

पाहतो पळत जाऊन तर काय

पांढरा शुभ्र चन्द्र भांड्यात आलेला


कौतुकाने आचेवरच हसत

माझ्या कडे पहात राहिलेला

पटकन मनसुबे सावरले

मोठ्या मनाने दर्शन घेतले

फोटों काढुन उत्साहात


आल्या दूध गंगेचे स्वागत केले

स्वागत करता करता रामायणाचे

महाभारतात पदार्पण होणार हे जाणवले

दूध गंगेचे कौतुक क्षणात

पहाता पहाता क्षणात ओसरले


दूध गंगा पिशवीतून आली

आणि चंद्राच्या साक्षीने वाहू लागली

फोनची करामत सारी

मी उघड्या डोळ्यांनी अनुभवली...!


Rate this content
Log in