दुष्काळाचं घाट
दुष्काळाचं घाट
1 min
809
कसा घातला दुष्काळानं घाट
झालं रिकामं धरणीचं पोट
स्रोत आटले पाण्याचे सगळे
कसा जाईल पाण्याचा घोट
निर्सगाच्या ग्रहनाला
आपणचं कारणीभूत
उपसा केला निसर्गाचा
भोगावे कर्माचे भभूत
दुष्काळाचे चटके
अख्खा प्राणिमात्र सोसतो
थेंबा थेंबा सोबत पाण्याचा
आपल्या रक्ताला आटवतो
जमिनीच्या भेगा घनदाट
काळजापर्यंत पोहोचल्या
अश्रू झाले कोरडवाहू
धारा घामाच्या वाहल्या
मुका झाला पशुपक्ष्यांच्या गोंगाट
भकास झालं शिवार ओसाड मोकाट
फोडती हंबरडा गाईम्हशी रानात
दुष्काळाने घेतला उभ्या जीवांचा घोट
एक माणूस एक झाडं असावं ब्रीदवाक्य
सुई हीच फाटकं आभाळ शिवण्याची
फोडतील मग ढग आभाळाला पान्हा
जपू हिरवळ वाढवू पातळी पाण्याची
