दत्त दिगंबर....!
दत्त दिगंबर....!
1 min
3.2K
दत्त दत्त झाले
सारे आसमंत
कोणासही नाही
थोडी उसंत
नाम नामात
आज दंग
भरला भक्तीचा
आगळा रंग
दत्त येता
आपल्या मुखात
जन्म सरे
साराच सुखात
प्रसन्न मन
प्रसन्न तन
नाही अनमान
उरे जीवनात
आता स्मरण
करू या मनात
साठवण्या
दत्त गुरुस अंतरात....!
