द्रौपदी... तेव्हाची आणि आताची
द्रौपदी... तेव्हाची आणि आताची


कोणे एके काळी घडलेली महाभारताची कथा
जन्म घेतलेला एका स्त्रीने तेव्हा
द्रौपदी नावाने नावारूपास आली
विवाहाने पाच दिशेने वाटली गेली
जुगार सारख्या खेळात दुष्ट्राकडून वस्त्र हरण तिचे झाले
अपशब्द ना तिला सामोरे जावे लागले
अन्यायाच्या अपमानाच्या आगीत ती जळत राहिली
काळ पुढे गेला
महिलांनवर अत्याचार वाढला
अत्याचाराच्या निकाल लागे पर्यत होई केवढी वर्ष
कोणाला मिळे न्याय तर कोण जगतोय अन्यायात
काळानुसार द्रौपदी बदलली
पण दुर्दैव तिला पाहण्याची नजर मात्र तीच राहिली