दोष नको..... सुधारणा करु
दोष नको..... सुधारणा करु
1 min
27.7K
समाजात वावरणारे
असंख्य नाटकांचे पात्र
कसं काय हरवून बसलो
विचारांचे छत्र
सोडून आरोप प्रत्यारोप
दोष नको.. सुधारणा करू
देवु झुटकारुन क्रोध,लोभ
चला मानवतावादी विचार धरु
अरे वासनेच्या आहारी
किती घास घेतले अविवेकी
असंख्य विकार पचवून
कसा तू शाकाहारी
कितेक पिढ्या बाटल्या
अंधकारी अहंभावात
काय उरलं मानवा
तुझ्या प्रतिष्ठा व नावात
चल मार्ग बदलव
अंधारलेल्या वाटेचा
दोष देवून काय मिळणार
मुखवटा उतरव चेहऱ्याचा
