STORYMIRROR

Shobha Sanjay Bavdhankar

Romance

3  

Shobha Sanjay Bavdhankar

Romance

॥ दोघं ॥

॥ दोघं ॥

1 min
233

बघता बघता तू आली माझ्या भाग्याचा गवसला सूर संपूर्ण आयुष्याचा बदलला गेला नुर

स्वप्नात बघितलं तुला लपून भासली तू परी माझा हात हातात घेऊन प्रत्यक्षात आली घरी


दिवसामागून दिवस चालले कितीतरी महिना वर्षं रोज नव्याने तू सुखवर्षाव करते, होतो हर्ष

गोजिरवाणी दोन फुलं देऊन फुलविली संसाराची वेल संपूर्ण जीवन सुंदर सुखमय केलं


क्षणभर वाटतं मी सागर तू सरीता देवाने तुला घडविले माझ्या सुखाकरीता 

सुखाचा भरला काठोकाठ घडा दोन जीव क्षणभर दिसले नाही एकमेकां जीव होतो पिसा वेडा॥


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance