STORYMIRROR

Rohit Khamkar

Romance

3  

Rohit Khamkar

Romance

दिवस रेटतोय

दिवस रेटतोय

1 min
226

अशी छेडुणी वाट, पाहता पाहता दूर गेलीस.

राहून राहून का होईना, आठवणीत सतत आलीस.


आलीस तशी तू केव्हाची, तीही अगदी कायमची.

आता वेळ बदलली, तयारी नाही दुरावा सोसण्याची.



सोसला तर आधीही, आता मन तयार नाई.

मी निघण्या आधी, त्यालाच झालीय बघा किती घाई.



तयार तर दोघेही आहोत, मी आणी माझ मन.

न्यायला यायच्या आधीच, आडवायला खुप कारणे लागतात पण.



लागू द्या कारने कितीही, येनार आम्ही दोघेही.

थोडा वेळ लागेल मात्र, दुरी थोडी सोसावी.



परत पुन्हा भेटू, नव्याने सार चालू होईल.

त्याच पावलांनी लक्ष्मी माझी, माझ्या घरी परत येईल.



येणार ती नक्कीच, त्याचीच वाट पाहतोय.

असच काहीतरी लिहून, रोज एक एक दिवस रेटतोय.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance