दिवाळी...!
दिवाळी...!
1 min
27.9K
आली दिवाळी आली दिवाळी
उठायला पाहिजे सकाळी सकाळी
जेंव्हा गाढ झोपेत असते
आपली आळी
अंधाऱ्या रात्रीची ती आळी
अन दुरून येणारी कुत्र्याची शिळी
गस्तीची असते आपली पाळी
विरून जाते गालीची खळी
तरीही साजरी होई दिवाळी
हवा सुटता गार हिवाळी
दिव्यांचा झगमगाट रातोरात
क्षणात भय पळवितो हातोहात
लाडू चिवडा चकली अनारसे
सारे हवे वाटते असावे घरचे
नको तो घरी बाजारी थाट
जरी भरून आले पुढे ताट
कानी यावे प्रभातकाळी मंगल गान
झाल्यावर आपले अभ्यंग स्नान
असलो जरी आपण खूप सान
दिवाळी साजरी व्हावी खूप छान....!!!!
