धनु राशी
धनु राशी
1 min
233
स्वामीगुरूंचे छत्र सदैव
असे यांच्या वरती
दिलखुलासपणे आयुष्य
जगते बघा धनु राशी
उदार उधळे व्यक्तिमत्व
हेवेदावे मुळीच नाही
चांगलं वाईट चाचपून घेते
अशी ही धनु राशी
तरी जरा घ्या बेतानी
जोवरी असे तिर कमानी
पिसाळले चुकून जरी
तर घेते सूड धनु राशी
स्वतंत्र विचारसरणी यांची
उगीच त्रागा करत नाही
भविष्याची चिंता न यांना
बेफिकीरपणे जगते धनु राशी
