STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

दहा...!

दहा...!

1 min
19.1K


किती गम्मत आहे

एकाला अन शून्याला

दोस्ती करावी वाटली

दोघांची मग

नंबर साठी

घालमेल झाली


एक म्हणे

मी पहिला

शून्य म्हणे

मी पहिला

वाद विवाद

चांगलाच रंगला


थोडा मग

हिरमोड झाला

शून्य उभारले आधी

नंतर उभारले एक

एकाची किंमत

एकच राहिली


दोस्तीची मग

किंमत कळाली

शून्य म्हणाले

थांब जरा

तुझी किंम्मत

मी बघ कशी वाढवते

एका पुढे जाऊन

शून्य उभे राहिले


क्षणात एकाचे

पहा दहा झाले

एक भलतेच आनंदले

शून्य म्हणाले चला

दोस्तीचे पहिले पाऊल पडले


दोघेही पहा आनंदले

शून्याचे कौतुक होता

शून्य चांगलेच गोल मटोल

गरगरुन पुन्हा फुगले....!


Rate this content
Log in