दहा जुलै(१०)
दहा जुलै(१०)

1 min

34
आजची चिंतनाची सुरेख सांज...!
आ ला वारा गेला वारा
ज रा बरे वाटले
ची डचिडीचे क्षण थोडे
चिं तनात घालवले...
त न शांत, मन शांत
ना ही म्हंटले तरी थोडे अनुभवले
ची रफाड आपलीच करून
सू र जरा जुळवले...
रे की झाली, ध्यान झाले
ख रे म्हणाल तर मन शांत झाले
सां जेला वाटले चांगलेच
ज न्मोजन्मीचे सौख्य लाभले....
अंतराची छेडता तार
हृदय भारावले
होते नव्हते ते दुःख सारे
विसरुनी मोकळे झाले...
आता निव्वळ आनंदी आनंद
गवसला वाटते परमानंद
जीवन जगतो होऊनी स्वछंद
लाभता मज पूर्णानंद....!
शुभ सायंकाळ...!