।। देव्हारा।।
।। देव्हारा।।
या देहाच्या देव्हाऱ्यातूनी देव कुणी पळविले
क्षणाभराच्या मोहा साठी दैवाला फसविले ।।धृ।।
सारे जपले , नाती आपुले , स्वार्था पोटी आले
स्वार्थ साधुनी , निः स्वार्थाची पोवाडे दुमदुम ले
रक्ताच्या या नात्या मधुनी वैर असे का आले
क्षणाभराच्या मोहा साठी दैवाला फसविले ।।१।
या हाताचे कर्म आपुले , याच जन्मी भोगीले
तारुण्याची नाशा नशेली , वार्धक्य थकविले
दैवगतीच्या चक्रा मधुनी सांगा कुणी का वाचिले
क्षणाभराच्या मोहा साठी दैवाला फसविले ।।२।।
कोण कुणाचे नाही उरले , जीव नकोसे झाले
माणुसकीच्या जंगला मधुनी श्वापद धावूनी आले
जगण्याच्या या मरणा मधुनी प्रायश्चित मिळाले
क्षणाभराच्या मोहा साठी दैवाला फसविले ।।३।।
।। सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय ।।
