STORYMIRROR

परेश पवार 'शिव'

Others

5.0  

परेश पवार 'शिव'

Others

देवघेव

देवघेव

1 min
904


शब्द न माझे कळले, न वाचलेस तू डोळे..

या मौनाची भाषा आताशा, तुला कळणार नाही..


तुझे गाव टाकले मागे, अन् गेलो रस्ताच विसरून..

आता नक्कीच माघारी, हे पाऊल वळणार नाही..


जाळ साहूनि अंतरीचा, मी राख जाहलो आहे,

तू जाळ कितीही मजला, मी आता जळणार नाही..


मी जखम जाहलो जुनी, ही मजवर धरली खपली..

मी जाणवेन थोडासा पण भळभळणार नाही..


घाव त्या चिंचेवरचे, न्याहाळत म्हणला रस्ता,

"आता वेळ मध्यान्हीची सहज टळणार नाही.."


मी चंद्र जाहलो ताऱ्यांची, ऐकूनि कर्मकहाणी..

दिसलो वा नाही दिसलो, तरीही निखळणार नाही..


ही देवघेव वचनांची, दोघे करूयात आता..

एकमेकांच्या नयनी आपण, कधी तरळणार नाही..


Rate this content
Log in