देशभक्ती
देशभक्ती
1 min
117
देशासाठी जन्म आपुले,
सेवा अपुले काम आहे |
देशासाठी चंदन होऊन,
झिजवित आपले प्राण आहे ||
स्वातंत्र्यासाठी लढले जे,
त्यांची आठवण आज आहे |
ज्यांनी दिला बलिदान आपला,
त्यांना कोटी कोटी प्रणाम आहे ||
हा देश माझा आहे,
यावर माझे प्रेम आहे |
या देशाची ठेवतो गरीमा,
हीच तर देशभक्ती आहे ||
प्राणाहुनही प्रिय आम्हाला,
या देशाची माती आहे |
वेगवेगळ्या भाषा असूनही,
निरनिराळ्या जाती आहे ||
चार दिशांनी गुजंत आहे,
देशभक्तीचा एकच नारा |
स्वदेशी माल वापरा तुम्ही,
विदेशी माल बहिष्कारा ||