डवूर
डवूर
1 min
384
पसरली बाधा कोरोनाची
झालेय डवूर वातावरण
घेऊ काळजी आरोग्याची
खाऊ घरचे भात न् वरण
हात धुवूया सॅनिटायझरने
टाळू एकमेकांचाही संसर्ग
ठेऊ परिसरच प्रदूषणमुक्त
वाचवूया जीव आणि निसर्ग
शिंका सर्दी ताप न् खोकला
येता पळा तुम्ही दवाखान्यात
नका करू तोंडास हस्तस्पर्श
येई कोरोना मग आटोक्यात
करूया घरच्या घरीच योगा
श्वासासाठीचा हा प्राणायाम
रोगप्रतिकारकशक्तीसाठीच
आहे सर्वोत्तम असा आयाम
