डवूर गढूळ
डवूर गढूळ
1 min
812
माणसाने इतर माणसाशी
माणसासमान राहावे
डवूर मनात न ठेवता
स्वार्थाने न कधीही वागावे....
अरे अरे माणसा हो
शहाणा रे आता तरी
मन तुझे साफ कर मानवा
कितीही संकटे आली जरी...
नको अविचारांचा व्यापार
वागण्यात ठेव नेहमी सदाचार
इतरांच्या भावनाही जप मानवा
मनात नकोत तुझ्या वाईट विचार...
