STORYMIRROR

Nalanda Wankhede

Others

5.0  

Nalanda Wankhede

Others

दाम करी काम

दाम करी काम

1 min
626



दाम करी काम

लबाड करी आराम

भ्रष्टाचाराच्या पुराला

कोण लावी लगाम


पुरवितो जो पैसा

त्याचेच इथे काम होते

रांगेत उभा राहणारा

जीवानिशी जाते


पायऱ्या चढून कार्यालयाच्या

वहाण झिजून जाते

मरण येते पुढ्यात तरी

काम तशेच राहते


पैशाचीच नाती इथे

पैसाच बोलतो खणखण

पैशाचाच इथे बोलबाला

गरीबाची होते चणचण


दाम दिल्याशिवाय

काम होत नाही

दाम नसेल जवळ तर

दर्शन ही होत नाही


पैसाचं नसतो सर्वकाही

कर्तव्य जाणून काम करा

कामाचे मिळते हो वेतन

गोरगरीबांचा विचार करा


Rate this content
Log in