STORYMIRROR

Sunita Ghule

Others

3  

Sunita Ghule

Others

दाम करी काम

दाम करी काम

1 min
1.0K


जगण्यासाठी हवाच पैसा

नको जीवनी साध्य मुळी

दाम करी काम तत्व हे

कल्पना नांदते मनी खुळी।


वात्सल्याने माय खपे ती

मोल दामाने होईल काय?

शब्दरत्नांनी बदलवी जीवन

पैका शहाणपण शिकविल काय?


दृष्टीसुख हा निसर्ग देतो

जलप्रतात, निर्झर झुळझुळते

पर्जन्य वर्षावाची देणगी

कुठल्या बाजारी ना मिळते।


व्याकूळ भूकने होती सर्वच

अन्न रुचीचे क्षुधा शमविते

पेैसा फक्त गरजा भागवी

सर्वस्व मानुनी जन दुःखी होते।


काम देई दाम, रुजवू नव्याने

कमवण्याचा मार्ग सोज्वळ

समाधानाने निद्रा रातभर

आत्मसुखाने भरेल ओंजळ।


Rate this content
Log in