STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

दादा म्हणजे घराचा

दादा म्हणजे घराचा

1 min
15K


दादा म्हणजे घराचा

भक्कम पाया

आधारवड आमचा

आई अन बहीण,भावाचा॥१॥


दादा मूर्तीमंत उदाहरण

कष्टाचे अन प्रामाणिकतेचे

अतीप्रिय त्यांना लेखन,वाचन

छान केले त्यांनी आमचे संगोपन॥२॥


रूजवले त्यांनी आमच्यात मूल्यसंस्कार

सात्विक विचार अन सदआचार

शिकवून सवरून केले मोठे

दादा तुमचे आभार आभाळाएवढे॥३॥


तुम्ही पत्रे लिहून पत्रकार झाला

सकाळ ,केसरी वर्तमानपत्रात

नावलौकीक मिळवला

आम्हांला तुमचा अभिमान वाटला॥४॥


दादा आज मीही शिकलै लिहायला

कविता करायला,लेख लिहाषला

पण माझ हे कौतुक पाहायला

आपण नाही राहिला,मला आर्शिर्वाद द्यायला...॥५॥


Rate this content
Log in