चुकलेले गणित...!
चुकलेले गणित...!
1 min
28K
चुकलेले गणित जीवनाचे
योग्य वाटेवर आणताना
मनास खूप यातना होतात
तोवर इतर वाटा
मार्ग मिळेल त्या
दिशेची सहज वाट धरतात
मागे वळून पाहण्याची
इच्छा ही तशीच
कोठेतरी विरून जाते
मग मात्र जीवनात
काही तरी
चुकल्याची जाणीव होते
भले भले महारथी
येथेच कच खाऊन
हार खातात
म्हणून तर
जीवनात आपल्या
नको ते प्रसंग सामोरे येतात
शेतात खत
बाजारात पत
घरात एक मत हे पटते
जेंव्हा जीवनात
चुकलेले गणित
दैव कृपेने पुन्हा सुटते....!!
