STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

चॉकलेट डे..!

चॉकलेट डे..!

1 min
1.4K


चॉकलेट डे फ़ॉकलेट डे

हे नवीनच आलंय फॅड

पोर झाली खुळ्या वयाची

पोरी माग जाता जाता सॅड


शिकाय गेलं कॉलेज मध्ये

नव्या युगाची भाषा कॅड

संगत लागता थोडी ब्याड

झालं जाता जाता पुरत मॅड


तरीही आज उपरती झाली

चूक त्याला कळून आली

गाडी पुन्हा रुळावर आली

मित्र मैत्रिणींची नाती जडली


खुल्या आकाशी पुन्हा विहारली

चॉकलेट खाऊन मैत्री बहरली

मोकळ्या मनाची किंमत कळली

गाडी जुन्याच मार्गावर पुन्हा धावली


काळजी नवपिढीची का करायची

उगाच वाढ का दाबायची

मोकळे हवे तसे वागू द्यावे

अन संस्काराचे खरे रूप पहावे


पश्चिमेकडच्या वाऱ्याचे भय

उगा मनी धरणे योग्य नव्हे

पूर्व क्षितिजावरच्या रवीराजाचे

गाऊ द्या आता त्यांना गोडवे


संस्काराची त्यांच्या हृदयी घट्ट मिठी

पश्चिमेच्या वाऱ्याची करते सुट्टी

जमुदेत जीवनी मैत्रीची नवी गट्टी

मोडुदेत खुशाल मापदंडाची जुनी पट्टी


नवं भारताच्या निर्मितीला

हातात हात गुंफून बळ त्यांचे मिळू दे

नाव भारत निर्मितेचे स्वप्न आमचे

त्यांच्याच हातून मूर्त रूप घेऊ दे...!


Rate this content
Log in