STORYMIRROR

SAURABH AHER

Others

4.0  

SAURABH AHER

Others

चल गड्या...

चल गड्या...

1 min
37

चल गड्या आपलं आयुष्य थोड आपणही जगुन घेवु ... 🙂

कशाला वाट पाहायची कुणी हसवण्याची , 

आपणच मनसोक्त हसुन घेवु , 

चल गड्या आपलं आयुष्य थोड आपणही जगुन घेवु ...🙂

चार माणसं बघतील , चार माणसं हसतील , 

त्या चार माणसांनाच आज विसरून जावु ..

चल गड्या आपलं आयुष्य थोड आपणही जगुन घेवु ...🙂

इतरांसाठी जगत आलोय , दुसर्यांसाठी राबत आलोय ,

आजपासुन स्वतालाच थोडा वेळ देवू 

चल गड्या आपलं आयुष्य थोड आपणही जगुन घेवु ...🙂

इतरांच्या दुःखात रडलोय , त्यांच्याच सुखात हसलोय , 

सुख नेमकं काय असत हेही बघुन घेवू ..

चल गड्या आपलं आयुष्य थोड आपणही जगुन घेवु ...🙂

थोड हसुन घेवु ,रडतारडता थोड रूसुन घेवू ,

चल सोबतीला माझ्या तुही बालपणातुन फिरून येवू ..

चल गड्या आपलं आयुष्य थोड आपणही जगुन घेवु ...🙂

आता ठरवलंय आनंदात जगायचं,  

स्वताचचं एक ध्येय ठेवायचं ...

चल मग सोड सारे दुखरे क्षण , अन् ध्येयवेडे होवू..

चल गड्या आपलं आयुष्य थोड आपणही जगुन घेवु ...🙂

Rate this content
Log in