Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Ishwari Shirur

Inspirational

3  

Ishwari Shirur

Inspirational

चल चालत...

चल चालत...

1 min
11.4K


चालणे तू सोडू नकोस... 

चालले तर अस्तित्व आहे

चालले तर तत्त्व आहे

नश्वर जगात या,

बाकी शून्य आहे 


घडायचे तर चालावे

चालताना चालते,

पडणे धडपडणे...

उठून पुन्हा चालणे 

अवघड असले किती,

तरी चालणेच बरे......!


धावत्या युगात चालताना,

थांबण्याचे सोंगही नको...

पावले शोधतील वाटा,

तू चालणे सोडू नको...


पावले ना थांबती,             

थांबती न वाटा, 

डंकणारे लाखो जरी 

उजळेल दाही दिशा...


चालता चालता घडावे...

असे चालणे हे,

कोणा चुकलेच नाही...

प्रारब्ध की प्रारंभ 

चालणचे सुकर आहे 


चालती वारकरी ही 

आळंदी पंढरीच्या वाटा 

चालताना भक्तमनी 

माय विठ्ठलाचीच आशा...


Rate this content
Log in