चक्रव्युह - आभासी जगताचा
चक्रव्युह - आभासी जगताचा


शोध लागले यशाची जननी
नवतरुण करू लागले मनमानी
मोबाईलचे पसरले जाळं
बोलण्याला लागले कायमचं टाळं
जो तो चॅटिंग, मेसेज करतो
दोन शब्द बोलावे ऐकावे जीव तळमळतो
मेसेजला थोडक्या शब्दातच द्यायचे उत्तर
भावना दडपल्या जाता तरी सर्व बेहत्तर
नाही त्यांना बोलायला वेळ
नवीन शोधाचा वाह्यात खेळ
भलतीच हुशार नवीन पिढी
खेळतात गेम तासनतास, बघतात गेमची सीडी
वाढत आहेत आत्महत्या स्टंटबाजी
मुलांनो बोलून मन मोकळे करा कळकळून सांगते आजी
थोडी चेष्टामस्करी करा, तोंडाने बोला, आप्तांशी साधा संवाद
नाहीतर जन्माला येईल पुढील पिढी मुकी, यात मुळीच नाही वाद॥