छोटा अभंग आई
छोटा अभंग आई

1 min

247
वात्सल्य सिंधू ती आई ।
एक मात्र माझी माई ।। १ ।।
गुण गावे तिचे किती ।
श्रेष्ठ तिची परिमिती ।। २ ।।
लेणे देती संस्कारांचे
नाते जोडी जिव्हाळ्याचे ।। ३ ।।
कुटुंबाच्या सुखासाठी
असते ती बाबापाठी ।। ४ ।।
माया ममता शिकवी
परोपकार दाखवी। ।। ५ ।।
श्रध्दा भक्ती देवावर ।
भूतदया प्राण्यावर ।। ६।।
सत्याची ती कास धरी ।
खोट्यास ती शिक्षा करी ।। ७ ।।
गोड बोलुनी जिंकावे ।
प्रेमाने जगा पहावे ।। ८ ।।
आईची ही शिकवण ।
केली मनी साठवण ।। ९ ।।
खूप तिची करुणाई ।
थोर माझी ती पुण्याई ।। १० ।।