छंद
छंद
1 min
413
छंद माझा आगळा वेगळा
वाटतो मज जगावेगळा
स्थितप्रज्ञ पाण्यातील बगळा
पाहतो नियतीचा पसारा सगळा..!
अवलोकनाची आवड मोठी
सांभाळतो मी, मती असून छोटी
लहानपणीची आठवते गोटी
खाऊन गोडशी मायेची तूपरोटी..!
वाचावे लिहावे काहीतरी
मानस छंदासम मी जपतो
हरघडीस नित्य नवे मी
जीवन जगता जीवन पाहतो..!
छंदच खरा आनंदी
जीवन जगण्याचा मज लागला
प्रत्येक क्षण अन् क्षण मज
सौभाग्याचा जीवनी लाभला..!
