STORYMIRROR

kishor zote

Others

3  

kishor zote

Others

छंद लेखणीचा

छंद लेखणीचा

1 min
952


छंद लेखणीचा

जीवा लागला असा

घेतला वसा

लेखनाचा....


साहित्य प्रकार

सहज मग हाताळले

आणि घेतले

समजून....


कथा कविता

नव काव्य प्रकार

चांगले विचार

प्रकटले.....


चारोळी मुक्तछंद

शब्द शब्द गुंफले

जसे उलगडले

अंतरंग....


अस्वस्थ मनाचा

तोच एक आधार

आचार विचार

लेखणीच....


शब्दच घेतील

ठाव तो मनाचा

ओलावा प्रेमाचा

चिरकाल....



साहित्याला गुण द्या
लॉग इन