चहापान
चहापान

1 min

18
पाऊस
छान पडत
होता माझ्या अंगणात
इच्छा झाली सर्वांच्या मनात
भजी
आत्ता करावी
लगबगीने पीठ कालवून
खमंग कुरकुरीत पटकन द्यावी
मिरची
मस्त तळून
ताव मारला त्यावर
सगळ्यांनी दोन प्लेट खाऊन
चहा
होता वाफाळलेला
चार बिस्किटे घेऊन
घोट घोट मग जोडीला
गप्पा
रंगल्या खूप
आठवणीतले ते दिवस
आले डोळयांसमोर माझ्या गुपचूप