STORYMIRROR

Manisha Potdar

Others

5.0  

Manisha Potdar

Others

छापा काटा

छापा काटा

1 min
7.0K


हा जन्म सार्थकी लावा

का ? करावा कुणाचा हेवा

जसा रुपयाचा छापा काटा

तसा सुख दु:खाचा वाटा

हा देतोय जीवनाचा धडा

अन भरतोय पाप पुण्याचा घडा || १ ||


कष्ट करत आनंदानं जगा

ह्या कटकटीला मागं टाका

येतो पैसा जातो पैसा

सत्कर्माचा गुंतवणुकीचा घ्यावा वसा

हा चालवा संसाराचा गाडा

अन भरतोय पाप पुण्याचा घडा || २ ||


माणुसकीचा नका करु चुराडा

नेत्यांनो नका करु भराडा

मानुसकीच्या बनवा नव्या वाटा

स्वीकारा आपल्या कर्माचा वाटा

देश सेवेचा भरवा घडा

अन भरतोय पाप पुण्याचा घडा || ३ ||


Rate this content
Log in