STORYMIRROR

Dinesh Kamble

Others

3  

Dinesh Kamble

Others

चहा...

चहा...

1 min
5.8K


कधी दुधाचा असतो.

कधी बिन दुधाचा तो...

कधी कमी साखरेचा.

पानचट ही असतो...


कधी असतो गवती.

दिसे कधी तो पिवळा...

घोटभर पिऊनी जो

क्षीण पळतो सगळा...


खारी बटर वा पाव.

बुडवून खाती सारे...

उकळतो घरोघरी

जेव्हा ये सगेसोयरे...


मित्र मेळा जेव्हा जमे.

चहापार्टी ती नित्याची...

भारी त्यात ती खमंग.

गोड गावठी गुळाची...


चला सारे मिळूनी या.

घेऊ डिकासीन चहा...

झोप तुमची क्षणात.

उडुनिया गेली पाहा...



Rate this content
Log in