Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

kishor zote

Others

3  

kishor zote

Others

चैत्यभूमी ( अभंग रचना )

चैत्यभूमी ( अभंग रचना )

1 min
7.1K


अस्पृश्य म्हणून | विटाळ होतसे ॥

शिक्षण घेतसे | भीमराव ॥१॥

जातीचे चटके | मनास लागले॥

अनवाणी चाले | गाडीमागे ॥२॥

पहिला मॅट्रीक I झाला समाजात ॥

हर्ष गगनात I रामजीचा ॥३॥

वेड वाचनाचे । झपाटून जात॥

त्या राजगृहात | ग्रंथालय ॥४॥

घटना लिहिली | भारत देशाची॥

जगात मानाची | एकहाती ॥५॥

बुध्दाच्या धम्माला I केले संजिवित॥

झाला हा भारत I बौध्द राष्ट्र॥६॥

सहा डिसेंबर I देश गोळा झाला ॥

अश्रू सागराला I चैत्यभूमी ॥७॥


Rate this content
Log in