चैत्रपालवी
चैत्रपालवी
1 min
426
पानगळ शिशिरात
पर्णहिन वृक्षवेली
चैत्र चाहूल लागता
दिसतील नटलेली।
जल पिऊन नवेली
नवे तारूण्य लाभेल
मऊ कोवळ्या पानांनी
फांदी फांदी बहरेल।
मावळता सूर्यबिंब
तिन्हीसांज ही खुलली
सोसवेना उन्हझळा
शित गारवा प्यायली।
दिस सरती बिकट
अंगोपांगी हिरवाई
पक्षीगण परतेल
आसऱ्याचे सुख घेई।
जगण्याची हिच रित
संकटाची नको भिती
जल शिंपेल तुषार
घट्ट आधाराला माती।
