STORYMIRROR

Trupti Naware

Others

3  

Trupti Naware

Others

चातक

चातक

1 min
13.3K


माझ्या आत

कुठेतरी खोलवर दडलेलं..

हात घालून पाहीला

खेचून बाहेर काढून पाहीले

पण मी पोहचू शकले नाही

माझ्या आत...खोलवर

ऐकू आला हुंकार

आणि प्रतिसादाचा गहीवर..

मार्ग ही सापडत नव्हता

आत जाण्याचा

वाटेत अंधार होता

अविश्वासाचा,भितीचा

माझेच मला कळत नव्हते

मी माझ्या आत

किती आणि कुठवर..

पण तगमग,ञागा

स्वस्थ बसु देत नव्हते

घामाळलेल्या देहावरती

ग्रीष्मात शहारे फुटले होते

आवाज कानोसा घेत होता

आतुन बाहेर येण्याकरता

दार खिडक्या चाचपडत होता

मनाच्या घराचे

श्वासाकरता

इतक्या आत दडलेल्या

माझ्या मी लाच

मी...हरवले होते

यापुर्वी ते इतके एकटे

कधीच वाटले नव्हते

किती जायचे आत

किती करायचे घात

सहज मोकळ्या

खोल अंतरंगात

गुंतलेल्या मौनाचे

हळुवार आवाज येत होते

एकांतात ती मैफील होती

सांज सुरांची निनादत होती

माझ्या आत कुठेतरी

खोलवर दडलेलं..

तिथे एक चातक

न बरसणार्या पावसाची

वाट पहात बसले होते !!!!


Rate this content
Log in