STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

चांदण्यांचा पाऊस..!

चांदण्यांचा पाऊस..!

1 min
994


चांदण्यांचा पाऊस पडताना

मी प्रत्यक्ष पाहिलं

त्याच क्षणी मी पहिलं

काव्य पुष्प वाहिलं


अशी असंख्य काव्य पुष्पे

गुंफून एक काव्यमाला

चंद्राच्या प्रेमा पोटी

मुक्त हस्ते चंद्रास आज अर्पिली


चन्द्र सुद्धा नम्र इतुका की

भाराने खाली झुकला

आणि चांदण्यांच्या सरीसह

तो अलगद खाली आला


इतका खाली आला की

माझा अपमान झाला

कारण त्याने नेमका

एक एप्रिलचाच मुहूर्त गाठला


चिंब भिजताना बरे वाटले

चांदण्यातही तो चंद्र सुखावला

एप्रिल फुल्ल म्हणून

हलकेच जागवून निघून गेला


आजही एक एप्रिलला

तो नियमित पणे चांदण्याच्या

पावसा सवे न चुकता येतो

आणि एप्रिक फुल्ल म्हणून जातो....!!



Rate this content
Log in