चांदण्या राती
चांदण्या राती
1 min
671
चांदण्या त्या राती
प्रतिक्षेत तुझ्या
एकांतात आशी
हृदयी तुच माझ्या
नको रे विरह
नको हा दुरावा
बावरले मन हे
समोरी तू यावा
मोहरली राञ
हसली चांदणी
आला एक क्षण
खुले रातराणी
या तुझ्या येण्याने
कलिका खुलली
हात हाती तुझा
प्रीत बहरली
हरवून गेले
प्रीतीत साजना
मिलन घटिका
लाजली ललना
