चांद उगवेल का गं
चांद उगवेल का गं
1 min
13.8K
हरवलेले गीत भेटेल का गं
प्रथम नेत्रीची प्रीत भेटेल का गं
बघ भावनांचा कल्लोळ झाला
आज तरी वेळ भेटेल का गं ।।
व्यवहारी विचारी पेलून सारी
ह्रद्याशी ह्रद्य खेटेल का गं ।।
तु ग्रृहलक्ष्मी मी अन्नदाता
तु मायाममता मी इःकर्तव्यता
मेळ दोघांचा होईल का गं ।।
गलित तन झाले मन न झाले
आज तरी चांद उगवेल का गं ।।
