बरसत ये
बरसत ये


रिमझिमत्या पावसात,
झिरमिर्त्या अंतरात
बरसत ये बरसत ये...
मेंदी रंग पाय ठेव या भिजल्या गवतावर
होय उरी हाय हाय हात तुझा पदरावर
ठुमकत ये, मुरकत ये, धारे परी फिरकत ये १.
थेंब थेंब अलंकार मिरवत ये अंगावर
लखलखती वीज तूच भीड मला एकवार
स्वप्नझुला झुलवत ये, प्रीत फुले फुलवत ये २.
या अनवट पावसात पेटले हे अंग अंग
भोगत हे ओलेपण प्रणयाला चढे रंग
ये मिठीत, ये दिठीत, ये कुशीत, खित ये ३.
सुकलेल्या रानातून फुंकरलेस नवे प्राण
मंतरली तूच हवा नटखट ते नयन बाण
गाई गीत अंतऱ्यात आज चाल बदलत ये ४.