बरं वाटलं...!
बरं वाटलं...!
1 min
799
बरं वाटलं...!
आज बाई बरं वाटलं
मुलांच्यात मूल होता आलं
सार ओझं बाजूस सारून
थोडं हलकं होता आलं
कामाचा रगाडा विसरताना
मुलांच्यात रमता आलं
रमता रमता मुलांच्यात
मूल होऊन मिसळता आलं
दरी वयाची नष्ट होता
मूल सारी आपली झाली
बाई बाई म्हणून
जीव मला लावू लागली
एक नवी सुरुवात झाली
झोपाळयाने किमया केली
आनंदी शिक्षणाची पुन्हा एकदा
आनंदी सुरुवात झाली.....!
