बोट दाखवणे....!
बोट दाखवणे....!
1 min
27.7K
मी जेंव्हा जेंव्हा
बोट दाखवितो
तेंव्हा तेंव्हा
माझी मलाच शरम वाटते
चार ही
उरली बोट
माझ्या कडेच वळलेली असतात
याची मला खंत वाटते
दुसऱ्या सांगे ब्रम्ह ज्ञान
आपण कोरडे पाषाण
मग एकची मनी दिसते
अज्ञानाचे परखड निशाण
त्या निशाणाने
इतकेच त्या क्षणी दाखविले
आधी केले मग सांगितले
हेच अंती मज शिकविले
स्वतः पासून
सुरुवात म्हणजे निम्मे राज्य जिंकणे
कशास मग लागते काही दुजा सांगणे
अन दुसऱ्या कडे उगाच ते पाहणे......!
