STORYMIRROR

Prashant Shinde

Others

4  

Prashant Shinde

Others

बोलला की तो!

बोलला की तो!

1 min
26.8K


ऐकून अभंग । झालोय बेधुंद ।

कानात मृदंग । सदा वाजे ।।


नाचती तालात। टाळ टाळकरी।

सारे वारकरी ।मनो भावे ।।


अभंग अनेक। गुंजती कानात ।

सारेच मनात ।साठ लेकी ।।


आता विठुराया । तोंड उघडतो।

आम्हांसी झाडतो। क्षणाधार्थ ।।


म्हणे काय झाले । असे का वागले ।

नाही का कळले । माऊली मी ।।


किती कष्टविता । भार हा टाकून ।

सारेच सांगून । फुका फुकी।।


तुमचा संसार । मी का रे बघावा ।

नोकर असावा ।वाटे जरी ।।


थकलो मी आता । उचला तुम्हीच ।

तो भार उगीच । नको मला ।।


झाले सारे थक्क । आश्चर्य वाटून ।

बसले आडून । देवळासी ।।


म्हणे पांडुरंग । जातो मी निघून ।

प्रशांत हा आहे । माझ्या साठी ।।


आले पांडुरंग । सत्वर निघून ।

आश्चर्य पाहून । मज झाले ।।


तरी देवा सांग । काय रे मिळाळे ।

होऊन मोकळे । अचानक।।



Rate this content
Log in