बोल
बोल
1 min
2.8K
जप नको, तप नको, साई नाम बोल
साई बोल साई बोल साई साई बोल ।।धृ।।
नाम तुझे घेता देवा मिटतंया घोर
रडता रडता हसतंया लहानमोठा थोर
मना मध्ये, तना मध्ये साई तुझे बोल
साई बोल साई बोल साई साई बोल ।।१।।
दर्शनाने मिळतंया सुख अनमोल
नजरेच्या या धाका मध्ये माया बहुमोल
सावरणाऱ्या मानाचाही जातो कसा तोल
साई बोल साई बोल साई साई बोल ।।२।।
भजनाची गोडी देवा केली बिन घोर
संगे माझ्या नाचतंया तुझे मन मोर
जन्मोजन्मी दारी तुझ्या गाईन तुझे बोल
साई बोल साई बोल साई साई बोल ।।३।
।।सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय ।।
